अंबरनाथमध्ये १६ बेवारस दुचाकी वाहनांचा लिलाव होणार


 

अंबरनाथ/ अशोक नाईक : अंबरनाथ वाहतूक उपविभाग कार्यालयाच्या आवारात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून १६ दुचाकी वाहने बेवारस आणि भंगार अवस्थेत पडून आहेत पुढील सात दिवसात या वाहनाची मालकी सिद्ध न झाल्यास वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाने कळवले आहे.


अंबरनाथ वाहतूक उपविभाग कार्यालयाच्या आवारात १६ दुचाकी वाहने बेवारस अवस्थेत पडून आहेत या वाहनांचे मालक व त्यांचा पत्ता शोधण्यासाठी वाहतूक विभागाने कल्याण आरटीओला कळवले होते. मात्र गेल्या पाच ते सहा वर्षांपासून भंगार अवस्थेत पडून असलेल्या ही वाहने मालकांनी घेऊन जावीत. अन्यथा पुढील  सात दिवसानंतर त्यांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाने जाहीर केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post