अनधिकृत बांधकामांवर अंबरनाथ नगरपालिकेची कारवाई


जावसई परिसरातील भूमाफियांचे धाबे दणाणले

अंबरनाथ/ अशोक नाईक : अंबरनाथ शहरात सर्वाधिक सरकारी आणि ४० टक्के खासगी जमीनक्षेत्र आहे. वनविभाग, सरकारी आरक्षित जागांवर होणाऱ्या वाढत्या आक्रमणात भूमाफिया जिथे कुठे मोकळी जागा दिसेल तिथे अनाधिकृत बांधकामांचा पेव फुटलेला असताना बुधवारी अनेक महिन्यानंतर नवनियुक्त मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभाग क्षेत्रीय अधिकारी नरेंद्र संख्ये यांनी कारवाई करत जावसई परिसरात काही भूमाफियांनी नैसर्गिक नाल्यावर अनाधिकृत बांधलेले वाणिज्य गाळे आणि चाळ, घरांवर बुलडोझरने कारवाई करत अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले.



अंबरनाथ पश्चिम भागातील जावसई, महेंद्रनगर परिसरात मोठ्या प्रमाणात भूमाफिया अनधिकृत बांधकामे करत असल्याच्या अनेक तक्रारींकडे दुर्लक्ष केला जात असल्यामुळे बोगस मालकी कागदपत्रांचा आधार घेऊन भूमाफिया घर विकून गोरगरिबांची फसवणूक करत असल्याच्या अनेक तक्रारी तहसीलदार, नगरपालिका प्रशासनाकडे होत असताना, हे भूमाफिया चर्च, मंदिर, मदरसा दर्ग्याआड अनधिकृत बांधकाम करून या चाळींमध्ये धोकादायक वस्ती वाढत चालली आहे. अशाही प्रकारच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे केल्या जात आहेत. 




जावसई परिसरा काही भूमाफियांनी नैसर्गिक नाल्यावर वाणिज्य गाळे आणि घर बांधली होती. त्यामुळे मूळ नाल्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला होता. बुधवारी अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात बुलडोझरच्या सहाय्याने येथील ५ वाणिज्य गाळे आणि ७ रहिवासी घरे तसेच सुमारे २५‌ हून अधिक घरांचे फाऊंडेशन जमीनदोस्त करण्यात आले. त्यामुळे काही दिवसांकरिता का असेना, येथील भूमाफियांचे धाबे दणादल्याची चर्चा परिसरात होऊ लागली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post