डोंबिवलीत कडकडकीत बंद

 




टिळक नगर शिक्षण प्रसार मंडळच्या वतीने शाळा बंदची हाक, 

 विद्यार्थ्यांच्या परीक्षा शनिवारी घेण्यात येईल 


डोंबिवली \ शंकर जाधव :  काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप तीन डोंबिवलीकरांचा बळी गेला आहे, या हल्ल्याच्या निषेधार्थ गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था यांनी उत्स्फूर्त डोंबिवली बंद पुकारला आहे.


टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व अस्थापना या बंदमध्ये सहभागी होत आहेत, त्यामुळे शाळा बंद असेल, परिणामस्वरूप गुरुवार दिनांक २४ तारखेला होणारी परीक्षा शनिवार दिनांक २६ तारखेला वेळापत्रकात नमूद केलेल्या वेळेनुसार होतील, याची सर्व विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी, आपण सर्वांनी या उत्स्फूर्त डोंबिवली बंद मध्ये सहभागी होऊन दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करूया, असा एक मेसेज शाळेच्या वतीने देण्यात आला. संपूर्ण डोंबिवली मध्ये वायरल देखील करण्यात आला आहे.





Post a Comment

Previous Post Next Post