मनसेच्या प्रकाश पाटील यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
दिवा \ आरती परब : दिवा शहरातील डम्पिंग ग्राऊंड बंद झाले तरीही महापालिकेच्या कचरा गाड्यातून खाडीकिनारी कचरा टाकला जात असल्याचे प्रकार घडत आहेत. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साबे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांना समजताच त्यांनी जोरदार विरोध दर्शविला. दिव्याच्या खाडीकिनारी तयार केलेल्या नवीन डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाड्या आणि मोठे डम्पर प्रकाश पाटील यांनी अडवून त्या कचऱ्याच्या गाड्यांची हवा काढून गाडीच्या हेडलाईट फोडून मनसे स्टाईलने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. मनसेच्या एकंदरीत आक्रमक भूमिकेमुळे हा डम्पिंग प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
दिव्यातील डम्पिंग ग्राऊंड बंद झालेले असतानाही या ठिकाणी डायघर डम्पिंग येथील व ठाणे शहरातील कचरा आणून टाकला जात असल्याचा आरोप मनसेचे प्रकाश पाटील यांनी केला आहे. गेल्या महिन्यात मुंब्र्यातून दिव्यात येणाऱ्या चुआ ब्रीजजवळ प्रकाश पाटील यांनी पाचषतास या कचऱ्याच्या गाड्या रोखल्या होत्या. त्यावेळी ही गणेश पाटील आणि प्रकाश पाटील यांनी तीव्र विरोध दाखवला होता.
दिवा डम्पिंगला मागील अनेक वर्षांपासून तेथे राहणाऱ्या रहिवाशांनी विरोध केल्याने अखेर हे डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यात आले होते. मात्र मागील काही दिवसांपासून छुप्या मार्गाने येथे कचरा टाकला जात असल्याचा आरोप मनसेचे प्रकाश पाटील यांनी केला आहे. तसेच काल मुंब्र्यातून कचऱ्याच्या गाड्या अडवल्याने दिवा मार्गे त्या कचऱ्याच्या गाड्या खाडीकिनारी जात होत्या. त्यावेळी कचरा टाकण्यासाठी आलेल्या कचऱ्याच्या गाड्या अडवून मनसेचे प्रकाश पाटील यांनी या कचरा गाड्यांच्या टायरमधील हवा काढून १५ तारखेनंतर या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी महापालिकेच्या गाड्या आल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिला गाड्यांच्या चालकांना दिला आहे.