Icse result : दहावीच्या परीक्षेत किमया बौवा ठाण्यात पहिली


 ICSE बोर्डाचा निकाल जाहीर

 ठाण्यात सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलची किमया बौवा टॉपर


ठाणे : बुधवारी सकाळी११ वाजता CISCE (Council for the Indian School Certificate Examinations) तर्फे ICSE (दहावी) व ISC (बारावी) २०२५ परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. या निकालात ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यंदाही आपली उज्ज्वल परंपरा कायम ठेवत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. विशेषतः सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलच्या किमया बौवाने ९९.८.% गुण मिळवून ठाणे जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे.



ICSE बोर्ड परीक्षेत ९९.८.% गुण मिळवणारे विद्यार्थी :  सुकृत खन्ना आणि करण फिलिप ( बॉम्बे स्कॉटिश स्कूल, माहीम), आयुषी जोशी ( लीलावतीबाई पोदार हायस्कूल, खार), जन्मेजय कोठारी ( कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, फोर्ट),  तीथी प्रवीण अग्रवाल (धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल, बीकेसी),  परम भाईवाल (पोदार इंटरनॅशनल, नेरुळ), किमाया बौवा ( सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल, ठाणे.) 

ठाण्यातील सिंघानिया स्कूल, डीएव्ही पब्लिक स्कूल, न्यू होरायझन स्कूल, आणि CP गोएंका इंटरनॅशनल स्कूल यांनी यावर्षीही उत्तुंग कामगिरी नोंदवली आहे. बहुतांश शाळांचा ९९% पेक्षा अधिक पासिंगचा निकाल लागला आहे, तर काही शाळांची १००% निकालाची नोंद करण्यात आली आहे.


सिंघानिया स्कूलच्या किमया बौवाने ९९.८% गुणांसह ठाणे जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले. तिच्या या यशामागे तिची सातत्यपूर्ण मेहनत, शाळेतील गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन आणि पालकांचा अमूल्य पाठिंबा असल्याचे तिने नमूद केले. “मी दररोज ठराविक वेळ अभ्यासासाठी देत होते, सोशल मीडियापासून दूर राहून मी एकाग्रतेने अभ्यास केल्याचे असे किमयाने सांगितले.  याच शाळेतील आयुष नायर (९९.६%) आणि अनुष्का देसाई (९९.४%) यांनीही टॉप टेनमध्ये स्थान मिळवले आहे.


निकालाची आकडेवारी (ICSE 2025)

राष्ट्रीय पातळीवरील एकूण पास टक्का: ९९.४७%

मुलींचा पास टक्का: ९९.३७%

मुलांचा पास टक्का: ९८.८४%

ठाणे जिल्ह्यातील सरासरी पास टक्का: ९९.७३%

१०० % निकाल नोंदवलेल्या शाळा (ठाण्यातील):

सुलोचनादेवी सिंगानिया स्कूल

डीएव्ही पब्लिक स्कूल

न्यू होरायझन पब्लिक स्कूल


वसंत विहार हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, ठाणे (Vasant Vihar High School & Junior College) ने २०२५ च्या ICSE (दहावी) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून, अनेक विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.  

पुनरपरीक्षा (Rechecking): जर तुम्हाला तुमच्या गुणांबाबत शंका असेल, तर ४ मेपर्यंत CISCE च्या पोर्टलवरून पुनरपरीक्षेसाठी अर्ज करू शकता. 

पूरक परीक्षा (Compartment Exam): जर एखाद्या विद्यार्थ्याला दोन विषयांपर्यंत कमी गुण मिळाले असतील, तर जुलैमध्ये होणाऱ्या पूरक परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.


निकाल पाहण्याची पद्धत

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी results.cisce.org या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला Unique ID, Index Number, आणि CAPTCHA कोड भरावा लागेल.





Post a Comment

Previous Post Next Post