मीरा -भाईंदर महापालिकेच्या अग्निशामक केंद्रांचे नवीन हेल्पलाईन क्रमांक जाहीर!



मीरा -भाईंदर : मीरा- भाईंदर महानगरपालिका अग्निशमन विभागाने शहरातील विविध अग्निशामक केंद्रांचे नवीन हेल्पलाईन क्रमांक जाहीर करत नागरिकांना आपत्कालीन प्रसंगी तत्काळ मदतीची हमी दिली आहे. ही माहिती अग्निशमन विभागाच्या मुख्य कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच वाढणाऱ्या आपत्कालीन घटनांवर वेळीच प्रतिसाद देण्यासाठी हे नवे क्रमांक नागरिकांसाठी अधिक प्रभावी ठरणार आहेत.


महानगरपालिका क्षेत्रात सध्या सात अग्निशामक केंद्रे कार्यरत असून प्रत्येक केंद्रासाठी स्वतंत्र मोबाईल आणि लँडलाईन क्रमांकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय कंकिया येथील मुख्य कार्यालयातील नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे.


संपर्क क्रमांकांची सविस्तर यादी पुढीलप्रमाणे आहे 

 स्व. कल्पना चावला अग्निशामक केंद्र, भाईंदर (पश्चिम): 8828499994, 9167860018, 022-28197637, 022-28041000, 022-28041001

सिल्वर पार्क केंद्र, मिरा रोड (पूर्व): 8828499777, 9167860017, 022-28553661

कंकिया केंद्र, मिरा रोड (पूर्व): 8828499995, 8657949714, 022-28105101

 उत्तान केंद्र, भाईंदर (पश्चिम): 8828499555, 829137021, 022-28452002

नवघर केंद्र, भाईंदर (पूर्व): 8828499222, 8657906833, 022-28192829

पेंकरपाडा केंद्र, मीरा रोड (पूर्व): 8828499997, 8657906834, 022-20890171

जेसल पार्क केंद्र, भाईंदर (पश्चिम): 8828499996, 9167860021, 022-28192830

तसेच, कंकिया मुख्य कार्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाचा क्रमांक आहे 8657949715, 022-28117102, 022-28117104


या नवीन हेल्पलाईन क्रमांकांव्यतिरिक्त, नागरिक १०१ हा राष्ट्रीय अग्निशामक आपत्कालीन क्रमांक देखील वापरू शकतात. कोणत्याही प्रसंगी या क्रमांकावर तात्काळ कॉल करून मदत मागवता येईल. महत्त्वाचे म्हणजे नागरिकांनी त्यांच्या परिसरातील केंद्राचा क्रमांक स्वतःच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवावा, जेणेकरून गरज पडल्यास त्वरित संपर्क करता येईल. चुकीच्या कॉल्समुळे यंत्रणेवर अनावश्यक ताण येऊ शकतो, याची नागरिकांनी विशेषतः काळजी घ्यावी.


या उपक्रमामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत मिळण्याचा वेग वाढेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. अधिक माहितीसाठी आणि अधिकृत घोषणांसाठी मीरा-  भाईंदर महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला https://mbmc.gov.in भेट द्यावी.





Post a Comment

Previous Post Next Post