भुसावळमधून ‘राष्ट्र प्रथम’ अभियानाची सुरूवात"


जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले रक्तदान

भुसावळ : ‘रक्तदान हे राष्ट्रीय कर्तव्य’ या भावनेतून प्रेरित होत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी भुसावळ येथील विभागीय रेल्वे रुग्णालयात स्वतः रक्तदान करून जनतेला रक्तदानासाठी साद घातली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या प्रतिसाद म्हणून “राष्ट्र प्रथम - रक्तदान अभियान” या १५ दिवसांच्या विशेष उपक्रमाची औपचारिक सुरुवात या निमित्ताने झाली. या उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते झाला. प्रमुख उपस्थितीत विभागीय रेल्वे व्यवस्थापक  पांडे व इतर अधिकारी होते.

पालकमंत्री पाटील यांच्या संकल्पनेतून "राष्ट्र प्रथम – रक्तदान अभियान" सुरू करण्यात आले असून, पुढील १५ दिवसांत जिल्ह्यातील प्रत्येक गाव व शहरात रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. संकलित रक्तपिशव्यांपैकी ५०% रक्त साठा सीमारेषेवरील जवानांसाठी तर उर्वरित जिल्ह्यातील आपत्कालीन गरजूंना देण्यात येणार आहे.



“सीमेवरील जवान शौर्याने लढत आहेत आणि जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाशी झुंज देत आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे रक्तदान,” असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कालच जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर भुसावळ येथून या अभियानाची सुरुवात झाली.




Post a Comment

Previous Post Next Post