डोंबिवली \ शंकर जाधव : नागरिकांच्या तक्रारींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करत त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देत आपण नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठीच आमदार झाल्याचे पुन्हा एकदा कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी दाखवून दिले आहे.
पिसवली परिसरातील पिंगारा हॉटेलच्या मागील रस्त्याची दुरावस्था झाली असून गटारातील सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्या बाबतच्या तक्रारींची दखल घेत आमदार मोरे यांनी मंत्रालयातून परतताना कार्यालय किंवा घर न गाठता थेट पिसवली गाठली. आमदार आपल्या समस्यांची तक्रारीची दखल घेत येत असल्याचे कळताच नागरिकांनी आमदारांकडे व्यथा मांडण्यासाठी एकच गर्दी केली. आमदार मोरे यांनी दुरावस्था झालेल्या रस्त्याची नागरिकांबरोबर फिरून पाहणी करत या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याबरोबरच गटारांची साफसफाई करण्याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना तिथूनच फोनवरून दिल्या.
प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करू न देखील आपल्या तक्रारींची दखल घेण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ मिळत नाही मात्र आमदारांकडे केलेल्या तक्रारीनंतर आमदार स्वतःहून येत आमच्या समस्या जाणून घेतल्या त्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याबद्दल नागरिकांनी आमदारांचे आभार मानले.
यावेळी आमदारांसोबत डोंबिवली शहर सचिव तथा विद्यानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सिताराम चव्हाण आणि पिसवली येथील उपतालुकाप्रमुख विलास भोईर, शाखाप्रमुख जयेश माळी , उपविभागप्रमुख सुभाष पार्चा, कार्यकर्ते शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.