सामान्य माणसाच्या असामान्य गोष्टीची कहाणी


अंबरनाथ/ अशोक नाईक : अंबरनाथ नगरपालिकेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी शैलेश साळुंखे यांनी ग्लोबल पावर लिफ्टिंग बॉडी लिफ्टिंग इंटरनॅशनल चॅम्पियनशिप, दुबई येथे (Global Powerlifting Bodyliftinng International Championship, Dubai) येथे ९८ किलो वजनी गटात स्कॉड्स ,बेंच प्रेस, पावर लिफ्टिंगमध्ये प्रथम पारितोषिक पटकावले आहे. त्यांचे अंबरनाथमध्ये सर्वच स्तरातून अभिनंदन होत असताना, अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी त्यांचे अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने कौतुक कराड पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


शैलेश साळुंखे हे गेली ३० वर्ष अंबरनाथ नगरपालिकेमध्ये नोकरी करत आहेत. नोकरी करत असताना देखील त्यांनी स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संधी निर्माण केली. या संधीमध्ये त्यांना मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्याकडून कायम प्रोत्साहन मिळाले. नुकत्याच पटकावलेल्या पारितोषिकामुळे त्यांना मिनी ऑलिम्पिक खेळण्याची संधी मिळाली आहे. अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी त्यांचे पालिकेच्या वतीने कौतुक केले आहे. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.




Post a Comment

Previous Post Next Post