चिपळूण : जीवन विकास सेवा संघ, चिपळूण यांच्या वतीने आयोजित "निसर्गप्रेमींशी संवाद" या विशेष स्नेहमेळाव्यास आज उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ सर्पमित्र आणि निसर्ग अभ्यासक दिनकर चौगुले यांच्या अमूल्य अनुभवातून प्रेरणा घेण्यासाठी निसर्गप्रेमी, वनअधिकारी, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी संस्थेच्या अध्यक्षा संगीता ओतारी, मानसशास्त्रज्ञ दीपक माळकरी, मानसशास्त्रीय समुपदेशक प्रा. अनिल पुनवतकर, वनविभागाचे राहुल गुंटे ज्येष्ठ सर्पमित्र बाळा शिर्के, संस्थेच्या स्वयंम सेविका तेजस ओतारी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी जेष्ठ पत्रकार धनंजय काळे यांचं ही बहुमूल्य मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुजा पुजारी यांनी प्रभावीपणे पार पाडले. दिनकर चौगुले यांच्या सखोल अनुभवकथनातून उपस्थितांना सर्पमित्र कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन, निसर्ग संवर्धन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत श्रोते मंत्रमुक्त झाले व नवे दृष्टीकोन मिळाले. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत यशस्वी ठरले असून भविष्यात अशा उपक्रमांची मालिका सुरु ठेवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला.