नाशिक : "आपण जर एकसंघ झालो आणि मूल्यसंस्कार रुजवले, तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखी तेजस्वी, पराक्रमी आणि शूर पिढी पुन्हा घडू शकते," असा प्रभावी संदेश अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांनी नाशिकच्या भव्य मेळाव्यात दिला. गोल्फ क्लब मैदानावर १ मे रोजी पार पडलेला मूल्यसंस्कार मेळावा आणि गुरु–मातृ–पितृ पाद्यपूजन सोहळा हजारोंच्या उपस्थितीत अपूर्व उत्साहात संपन्न झाला.
गर्भसंस्कार, बालसंस्कार, पर्यावरण, आरोग्यशास्त्र, योगासने, वेद-विज्ञान अशा विषयांवरील ज्ञानदालन प्रदर्शन सेवेकऱ्यांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले. ‘पालकत्व एक कला’ आणि ‘करिअर मार्गदर्शन’ या विषयांवर तज्ज्ञ सत्रेही पार पडली.
मेळाव्याची सुरुवात महाराष्ट्र गीताने, तर सांगता पसायदानाने झाली. दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन, प्रकृती बीज पूजन या दिव्य सोहळ्यांनी वातावरण मंत्रमुग्ध झाले. या वेळी आमदार सीमता हिरे, गुरुपुत्र नितीन मोरे, विविध क्षेत्रातील मान्यवर मंचावर उपस्थित होते.