डोंबिवली एमआयडीसी परिसरात रासायनिक गॅसच्या वासाने नागरिक त्रस्त

 


  प्रदूषण नियंत्रण मंडळाने दखल घेण्याची मागणी 


डोंबिवली \ शंकर जाधव  : डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी विको नाका, उस्मा पेट्रोल पंप व आजूबाजूकडील परिसरात सोमवारी  सायंकाळी साडेपाच सहा दरम्यान गॅस वास पसरला होत पसरला होता. मिलापनगर मधील डॉ. राजन माने हे त्या परिसरातून  जात असताना त्यांना हा तीव्र वास/गॅस जाणवला. त्यांनी ही बाब मानपाडा पोलिसाना कळवली आहे. तीव्र गॅस परिसरात पसरण्या बाबत अनेक नागरिकांनी गंभीर चिंता व्यक्त केली.

  काही दिवसांपूर्वी म्हणजे ७ एप्रिल रोजी  वाहनांवर, लोकांच्या कपड्यावर काळसर ठिपके/डाग पडल्याची विचित्र घटना एमआयडीसी परिसरात घडली होती. नागरिकांनी ही बाब प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळविल्यानंतर त्यांनी  या घटनेची परिसरात फिरून चौकशी केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याचे काही नमुने घेवून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी परिसरात तीव्र गॅस पसरण्याची जी घटना घडली त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post