ठाणे जिल्ह्यात दहावीच्या निकालात मुलींचे भरघोस यश!

 


ठाणे :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इ. १० वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९५.५७% इतका लागला असून, एकूण १ लाख १३ हजार ६५८ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ०८ हजार ३११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुलींचा निकाल ९६.६९% तर मुले ९४.५०% उत्तीर्ण झाले असून, मुलींची सरासरी कामगिरी मुलांपेक्षा जास्त आहे.

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक असून हा एक सकारात्मक बदल आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललिता दहितुले यांनी सांगितले की, "यंदा ठाणे जिल्ह्यात मुलींनी यश मिळवून आपली शैक्षणिक प्रगती सिद्ध केली आहे. ही घोडदौड निश्चितच प्रेरणादायक आहे."

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करताना म्हटले की, "विद्यार्थ्यांनी सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. शिक्षण क्षेत्रातील प्रगतीसाठी जिल्हा परिषद कटिबद्ध आहे."


Post a Comment

Previous Post Next Post