डोंबिवली \ शंकर जाधव : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांच्या वतीने बुधवारी कल्याण येथील दुर्गाडी किल्ला ते आचार्य अत्रे रंगमंदिर मंदिरपर्यत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कल्याणात प्लास्टिकविरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली.एकल प्लास्टिक वापर टाळा, कापडी पिशव्याचा वापर करा, असा संदेश देत पर्यावरणाचे रक्षण करा असे यावेळी रॅली सांगण्यात आले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे रिजनल ऑफिसर जयवंत हजारे, तंत्रज्ञ सल्लागार नंदकुमार गौरव, प्रो.पुरुषोत्तम काळे, पालिकेच्या एक्झिकेटीव्ह इंजिनियर रोहिणी लोकरे, सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र अध्याक्ष डॉ. देवेन सोनी आदी मान्यवर उपस्थित होते.कल्याण येथील दुर्गाडीकिल्ला ते आचार्य अत्रे रंगमंदिर पर्यत जनजागृती रॅली काढण्यात आली.प्लास्टिक वापर नको, पर्यावरणचा विचार करा, एक पृथ्वी- एक संधी, प्लास्टिकपासून मोकळी करू जमिनी, प्लास्टिक बंदी गरज आहे..पर्याय नाही....स्वच्छ पृथ्वी..हिरवी पृथ्वी..प्लास्टिक विना नवी सुष्टी..,प्लास्टिक मुक्त जीवनशैली...सुदंर पृथ्वीची गुरुकिल्ली.., प्लास्टिक पिशवीला नकार, पर्यावरणाला होकार... असा संदेश देणारे बॅनर हाती घेण्यात आले होते.पुढे आचार्य अत्रे रंगमंदिर सभागृहात पालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पर्यावरण जनजागृतीवर थोडक्यात माहिती दिली.