डोंबिवली \ शंकर जाधव : भाजपचे आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी संभाव्य निवडीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत अभिनंदनाचे बॅनर झळकले आहे.
"सर्व करतील गर्व, असं असेल पर्व!" अशा शब्दांसह रवींद्र चव्हाण यांचा फोटो या बॅनर लावण्यात आला आहे.विशेष म्हणजे आमदार रवींद्र चव्हाण हे ३० जून रोजी अधिकृतरित्या महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करणार असून,१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वरळी डोम येथे प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे.मात्र याआधीच आमदार रवींद्र चव्हाण यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेल्या अभिनंदनाच्या बॅनर बाजीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.