डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांचा लहान मुलीवर हल्ला

 


घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद 

डोंबिवली \ शंकर जाधव : डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. एका लहान मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवत चावा घेत खेचत नेत असल्याचे  सीसीटीव्ही कॅमेरात दिसत आहे. यावेळी काही वेळात एक इसम मदतीला धावला आणि त्याने भटक्या कुत्र्यांनपासून लहान मुलीची सुटका केली. ही घटना मंगळवारी २४ तारखेला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव रेती बंदर रोडवरील शिव मंदिरजवळ घडली.ही घटना जवळील एका घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

 

डोंबिवली व ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांनी आता थेट टोळी बनवत माणसांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. एकटा माणूस दिसला की भटके कुत्रे त्यांच्या अंगावर धावून जातात. त्याच्यावर हल्ला करत चावा घेत असल्याने घाबरलेला तो माणूस आरडा ओरड करतो. अशा वेळी जवळील लोक त्याच्या मदतीला धावत त्याची कुत्र्यांपासून सुटला करतात. अशीच एक घटना डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गावात घडली. कुत्र्यांच्या टोळीने एका लहान मुलीवर हल्ला करत तिला खेचून नेत असताना एक इसम तिला कुत्र्यांपासून वाचवतो. ही घटना जवळील एका घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post