डोंबिवली \ शंकर जाधव : शालेय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून भारतीय जनता पार्टी नेहमीच शैक्षणिक मदत करत असते. आमदार रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करतात.हा उपक्रम खंबाळपाडा येथील प्रभाग क्रमांक ४६ चे माजी नगरसेवक साई शेलार यांच्या जनसंपर्क कार्यालयात वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
भाजपाचा सामाजिक व शैक्षणिक कार्यात नेहमीच खारीचा वाटा असतो असे शेलार यांनी सांगितले.यावेळी स्वरा शेलार, विभाग अध्यक्ष चिंतामणी पाटील,गंगाराम शेलार, कल्याण जिल्हा जाती उपाध्यक्ष विनायक गायकवाड ,डोंबिवली शहर झोपडपट्टी महासंघ अध्यक्ष दिलीप भंडार ,अंजली गांगल, दीपेश पाटील , शेखर शर्मा, संजय शेलार , विशाल शेलार,गणेश पाटील, नितेश शेलार, विजय शेलार,भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
