कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे संस्थापक महेंद्र दळवी सर, सहायक पोलिस निरीक्षक राजु तोरडमल, चंदू दळवी सर आणि मुख्याध्यापिका श्रीमती ज्योत्स्ना सोनी मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आली. या वेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विठोबा- रुक्मिणीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
या उपक्रमात मुंब्रा पोलीस ठाण्याचे मोलाचे सहकार्य लाभले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे वारी सुरळीत आणि शांततेने पार पडली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून विठ्ठल नामाचा जयघोष करत गावभर भ्रमण केले.
शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वारीनंतर स्वच्छता मोहिमेद्वारे शाळा परिसर स्वच्छ करण्यात आला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होण्यास मदत झाली असून, धार्मिक सणांचे महत्त्व व समाजासाठी योगदान याची शिकवण मिळाली.