जनसेवेचा नवउमेद उपक्रम!”
खोणी (कल्याण ग्रामीण) : कल्याण ग्रामीण मतदारसंघातील खोणी येथील खासदार कार्यालयात ७ ते १३ जुलै या कालावधीत “आधार कॅम्प” चे आयोजन करण्यात आले. आमदार राजेश गोवर्धन मोरे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाला खाणी गावचे सरपंच हनुमंत ठोंबरे साहेब, महिला जिल्हा संघटक कविता गावंड मॅडम, दीपा झुंजारे (महिला संघटक – पलावा डाऊन टाऊन), बंडूशेठ पाटील साहेब, शाखा प्रमुख मारुती ठोंबरे, तसेच अभिजीत गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना आधार कार्डमध्ये सुधारणा, अपडेट किंवा नवीन नोंदणीसाठी घराजवळच सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः वृद्ध नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी यांना याचा अधिक लाभ होणार आहे. आधार अद्ययावत नसल्यामुळे अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळवताना अडचणी येतात, यासाठी आधार कॅम्प उपयुक्त ठरणार आहे.
या वेळी आमदार राजेश मोरे यांनी सांगितले की, शासनाच्या सुविधा प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून या प्रकारचे उपक्रम हवेच आहेत. “आधार सशक्त – सुविधा स्पष्ट” या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Tags : #RajeshMore #KalyanGramin #Khoni #AadhaarCamp #Shivsena #dcmeknathshinde #drshrikantshinde #जनसेवा