डोंबिवली \ शंकर जाधव : डोंबिवलीजवळील निळजे येथील वर्टेक्स विला सोसायटीत मानपाडा पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईमुळे तब्बल २ कोटी १२ लाखांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. या प्रकरणात आफ्रिकन नागरिकास अटक करून आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट उघडकीस आणले गेले. आठवडाभरात मानपाडा पोलिसांनी सलग दोन मोठ्या कारवाया करत एकूण ४ कोटींहून अधिक किमतीचे एमडी ड्रग्स जप्त केले असून, ५ आरोपींना अटक करण्यात आले आहे. ही अतुलनीय यशस्वी मोहीम आहे.
युवासेना कल्याण जिल्ह्याच्या वतीने झोन ३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सर व मानपाडा सीनियर सांदिपन शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली व मानपाडा पोलिसांचे अभिनंदन केले.युवापिढीला नशेच्या विळख्यातून वाचवण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेली ही तत्परता, सजगता आणि धाडस अभिमानास्पद आहे. या कार्यात युवासेना नेहमीच पुढाकार घेऊन जनजागृती करेल असे आश्वासन युवासेना कल्याण जिल्हा अध्यक्ष जितेन पाटील यांनी दिले.यावेळी युवसेनेचे कल्याण जिल्हा सचिव श्री.राहुल म्हात्रे, उपजिल्हा अध्यक्ष प्रथमेश पाटील, भूषण यशवंतराव डोंबिवली शहर अध्यक्ष सागर जेधे, कल्याण वेस्ट शहर अध्यक्ष सुजित रोकडे,विधानसभा अध्यक्ष सागर दुबे, विधानसभा उपाध्यक्ष जय देसले, विक्की जोशी, चिन्मय जयंता पाटील,, सुचेत डामरे उपस्थित होते.