कल्याण \ शंकर जाधव : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १४, मोहने कोळीवाडा परिसरात आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या सोहळ्याला शहरप्रमुख रवी पाटील, शाखाप्रमुख रोहन कोट यांच्यासह अनेक स्थानिक मान्यवर उपस्थित होते.
या विकासकामांत प्रामुख्याने खालील कामांचा समावेश आहे:
- कान्हू काटेकर यांच्या घरापासून बागडे बिल्डिंगपर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण
- शंकर लडकू कोट यांच्या निवासस्थानाजवळील काँक्रीटीकरण
- रामवाडी मयुर तळेकर यांच्या घरापासून हांडे निवास पर्यंत गटार व पायवाटा बांधणी
- राजमाता वडापाव ते राजेंद्र शॉपिंग सेंटर पर्यंत सिमेंट काँक्रीटीकरण
- हसना हॉटेल मागील सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती
या सर्व विकासकामांचा पाठपुरावा शाखाप्रमुख रोहन कोट यांनी केला आहे. स्थानिक रहिवाशांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण होणार असल्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण असून, नागरिकांनी आमदार भोईर यांचे विशेष आभार मानले आहेत.
यावेळी विभागप्रमुख नाना काटकर, विधानसभा सहसंघटक विजय परियार, तसेच युवसेना, महिला आघाडी, सोशल मीडिया टीमचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विकासकामांमुळे मोहने कोळीवाडा परिसरातील मूलभूत सुविधा बळकट होणार असून, सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.