डोंबिवली पश्चिमेकडील रस्त्यातील खड्ड्यात लावले रोपटे

 


सुभाष रोडवर ठाकरेंच्या शिवसेनेचे निषेध आंदोलन 

डोंबिवली \ शंकर जाधव  : डोंबिवली पश्चिमेकडील सुभाष रोडवरील खड्डेमय स्थितीमुळे वाहनचालकांचे हाल होत असून, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) च्या पदाधिकाऱ्यांनी खड्ड्यांत प्रतिकात्मक रोपटी लावून प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध केला.


हे आंदोलन कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी डोंबिवली पश्चिम शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, विधानसभा अधिकारी आदित्य पाटील, सांस्कृतिक अधिकारी मिलिंद दुडवडकर, उपशहरप्रमुख संजय पाटील, श्यामराव चौगुले, विभागप्रमुख राजेंद्र सावंत, विभाग अधिकारी अनिल मुथा, शाखाप्रमुख तुषार नाईक, ओमकार पांचाळ, वराडकर, तसेच डोंबिवली पूर्व कार्यालयप्रमुख नारायण गायकवाड, कैलास सणस, प्रवीण साळवी यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



सुभाष रोडवरील खड्डे पावसाळ्यात मोठ्या त्रासाचे कारण बनले आहेत. याबाबत बोलताना शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे म्हणाले, "स्थानिक नागरिक आमच्या शाखेत सतत रस्त्याच्या खड्ड्यांबाबत तक्रारी करत आहेत. परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. अपघात झाल्यानंतरच खड्डे बुजवले जाणार का? याचे उत्तर प्रशासनाने द्यावे."ते पुढे म्हणाले की, "खड्डे बुजवण्याचे काम हे प्रशासनाचे आहे. परंतु वारंवार सांगूनही प्रशासन झोपलेले आहे. म्हणूनच आम्ही प्रतिकात्मक रोपटी लावून हे आंदोलन केलं आहे.


सुभाष रोडवरून रोज शेकडो वाहनचालक जात असताना, रस्त्यावरील मोठमोठे खड्डे वाहनांसाठी धोकादायक ठरत आहेत. स्थानिक नागरिकांत याबाबत तीव्र संताप असून, प्रशासनाने तत्काळ खड्डे बुजवून वाहनचालकांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी होत आहे.


Tags : #Dombivli #SubhashRoad #ShivSenaUBT #DeepeshMhatre #PrakashTelgote #RoadPotholes #DombivliNews #CivicIssues #MunicipalNegligence


Post a Comment

Previous Post Next Post