दिवा / आरती परब : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व लोकप्रिय नेते मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, दिवा मंडळाच्या वतीने काल भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. "रक्तात आहे राष्ट्रभक्ती" या सामाजिक जाणिवेतून प्रेरित होत उमलत्या शुभेच्छा रक्तदानातून व्यक्त करण्याचा उद्देश या शिबिरामागे आहे.
या शिबिराचे आयोजन प्रशांत नगर, मुंब्रादेवी कॉलनी रोड, दिवा (पूर्व) येथे सायंकाळी ४ ते ८ या वेळेत रक्तदान करण्यात आले. या शिबिरात अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घेऊन गरजू रुग्णांचे प्राण वाचवावेत, असे आवाहन आयोजकांनी केले होते.
या उपक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, दिवा शीळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सपना रोशन भगत, विजय भोईर, रोशन भगत, गणेश भगत, गौरी शंकर पटवा, रवी मुनुनकर, विठ्ठल गावडे, क्रांती सिंह व कार्यकर्त्यांचे, महिला कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उल्लेखनीय बाब म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छा न देता, समाजोपयोगी कार्य करून विधायक उपक्रम राबवण्याची ही अभूतपूर्व संकल्पना होती.