डोंबिवलीत आषाढी एकादशीनिमित्त उपक्रम
डोंबिवली \ शंकर जाधव: आषाढी एकादशी निमित्ताने, आज रविवारी भारत विकास परिषद, कॅप्टन विनय कुमार सचान डोंबिवली शाखेतर्फे सालाबादप्रमाणे प्रमाणे तुळशी वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. डोंबिवलीमधील गणेश मंदिर संस्थान, एमआयडीसी मिलापनगर गणेश मंदिर, गोविंदानंद श्रीराम मंदिर (आफळे मंदिर), पी.एन. टी.येथील हनुमान मंदिरात भारत विकास परिषदेचे सभासद सकाळ पासून तुळशी वाटपासाठी उपस्थित होते. सर्व मंदिरे मिळून सुमारे २५०० तुळशीची रोपे वितरीत करण्यात आली असे अध्यक्षा वृंदा कुलकर्णी ह्यांनी सांगतले. ह्यावेळी सर्व मंदिरात भारत विकास परिषदेचे अनेक नवे आणि जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.