आशीर्वादाची नांदी अन् विजयाची तयारी!

Maharashtra WebNews
0



रोहिदास मुंडे यांच्या हस्ते एकविरा मातेची आरती; कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा व नवचैतन्याचा संचार


दिवा \ ( आरती परब ) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे येणाऱ्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील एकविरा देवीच्या चरणी श्रद्धाभावाने साकडे घालण्यात आले. कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांच्या हस्ते भक्तिपूर्वक आरती करण्यात आली. पक्षाच्या यशस्वी वाटचालीसाठी आणि जनतेच्या आशीर्वादासाठी देवीच्या चरणी नम्र प्रार्थना करण्यात आली.


या धार्मिक प्रसंगी विधानसभा संघटिका योगिता नाईक, विभागप्रमुख संजय भोई, नागेश पवार, संजय जाधव, उपविभाग प्रमुख अजित माने, संदीप राऊत, विभाग संघटक राकेश जाधव, महिला उपविभाग प्रमुख धनश्री कोळी, तसेच अनेक शिवसैनिक, पदाधिकारी आणि निष्ठावान कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

एकविरा आईच्या आशीर्वादानेच आम्ही पुढील लढती आत्मविश्वासाने आणि जनतेच्या विश्वासाने लढू. आईच्या कृपेनेच खऱ्या अर्थाने विजय शक्य आहे.

— रोहिदास मुंडे, विधानसभा प्रमुख, कल्याण ग्रामीण

मुंडे पुढे म्हणाले की, "हा धार्मिक सोहळा ही केवळ श्रद्धेची बाब नसून, हा विजयाच्या निर्धाराचा आणि जनतेच्या प्रश्नांसाठीच्या लढ्याचा संकल्प आहे. येणाऱ्या काळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा झेंडा अधिक बळकटपणे उंचावेल याचाच हा शुभारंभ आहे."

कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य व ऊर्जा निर्माण करणारा हा प्रसंग आजच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विशेष लक्षवेधी ठरला आहे. लवकरच सुरू होणाऱ्या राजकीय लढतीच्या पार्श्वभूमीवर ही "आशीर्वादाची नांदी" निश्चितच विजयाची तयारी करणारी ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थित सर्वांनी व्यक्त केला.


Post a Comment

0Comments

Post a Comment (0)