डोंबिवली \ शंकर जाधव : डोंबिवलीत आषाढी एकादशीच्या औचित्याने टिळकनगर माध्यमिक आणि काँमर्स काँलेज विभाग व टिळकनगर शाळेची वारकरी दिंडी काढण्यात आली होत. या दिंडीत पालक व नागरिक सहभागी झाले होते.
प्रत्यक्ष पंढरीच्या वारीचा अनुभव आल्याचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकवर्गाने सांगितले. फुगडी, रिंगण, आणि बरेच काही प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी दिंडीतून चालताना केली. टिळकनगर, संत नामदेव पथ आणि जिजाई नगर, परिसर विठुरायाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. दिंडीसाठी मार्गदर्शन शाळेतील सर्व पदाधिकारी आणि शिक्षकांनी केले होते.