अंबरनाथ/अशोक नाईक : देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र असा योग जुळून आला. नुकतीच भारतीय जनता पार्टी,महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केंद्रीय निरीक्षक किरण रिजीजू यांनी केली. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने संघटनेच्या राज्य परिषद सदस्यपदी तथा अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा वर्षाव केला जात आहे.
महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकतीच भाजपा संघटनेच्या राज्य परिषदेवरील सदस्यांच्या नियुक्तीची यादी जाहीर केली आहे. या यादीत अंबरनाथ शहरासाठी अभिमानास्पद ठरणारी नियुक्ती झाली आहे. जनतेतून थेट निवडून आलेले अंबरनाथचे लोकप्रिय माजी नगराध्यक्ष आणि सर्वांचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जाणारे भाजपा नेते गुलाबराव करंजुले पाटील यांची राज्य परिषदेच्या सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्ती घोषणेनंतर अंबरनाथ शहरात आणि भाजपाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साही आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथमध्ये विविध विकासकामे झाली असून, त्यांनी जनतेशी प्रामाणिक आणि थेट संवाद कायम ठेवला आहे. या नियुक्तीमुळे अंबरनाथ शहराचे राज्य पातळीवर प्रतिनिधित्व अधिक बळकट होणार आहे. या निमित्ताने अंबरनाथ शहर भाजपा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.