नालेसफाई न झाल्याच्या विरोधात दिवा मनसेची आक्रमक भूमिका

Maharashtra WebNews
0

  


दिवा प्रभाग समिती समोर टाकला कचरा

दिवा \ आरती परब : दिवा शहरातील गटारांची आणि नाल्यांची साफसफाई करण्या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिकेचा घनकचरा विभाग डोळे बंद करून बसला आहे, असा आरोप दिवा मनसेने केला आहे. 


तर दिव्यातील नाल्यांची आणि गटारांची साफसफाई न झाल्यास प्रभाग समिती समोर कचरा आणून टाकू असा इशारा दिवा मनसे कडून पावसाळ्याआधी देण्यात आला होता. त्यानुसार आज मनसेने प्रभाग समिती समोर कचरा आणून टाकला. पण आज दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, घनकचरा विभागाचे अधिकारी समिती मध्ये उपस्थित नव्हते. जर उद्यापासून नाल्यांची आणि गटारांची सफाई सुरू झाली नाही तर दिवा प्रभाग समिचीच्या सर्व अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये कचरा आणून टाकू असा इशारा मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी दिला आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)