डोंबिवलीतील श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतले दर्शन

Maharashtra WebNews
0

 


डोंबिवली \ शंकर जाधव : दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीला डोंबिवली पश्चिमकडील स्टेशनपरिसरात हरी ओम रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या वतीने आषाढी श्री विठ्ठलाची मूर्ती उभी करून कीर्तन केले. भाजप प्रदेशअध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दरवर्षीप्रमाने यावेळीहि या ठिकाणी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन सर्वांना सुखात, आनंदात ठेव अशी प्रार्थना केली. कीर्तन सुरु असतानाही चव्हाण यांनी टाळ वाजत विठ्ठलाच्या भावाचा गजर केला.

अनेक वारकरी टाळ- मृदूंग घेऊन मंडळी कीर्तन करतात.भजन ऐकण्याकरता नागरिकांनी गर्दी केली.यावेळी भाजप कल्याण जिल्हाअध्यक्ष नंदू परब, डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष पवन पाटील, सचिव डॉ. सर्वेश सावंत यांसह अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)