मॅक्स व्हर्स्टॅपेनचा वर्चस्वपूर्ण विजय

Maharashtra WebNews
0

 



बेल्जियन ग्रां प्री स्प्रिंट रेस :पियास्त्री आणि नॉरिस मागे

स्पा, बेल्जियम :  रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टॅपेनने बेल्जियन ग्रां प्री स्प्रिंट रेसमध्ये मॅक्लारेनच्या ऑस्कर पियास्त्री आणि लँडो नॉरिस यांना मागे टाकत विजयी बाजी मारली. पहिल्याच फेरीत पियास्त्रीला स्लिपस्ट्रीमचा फायदा घेत व्हर्स्टॅपेनने केम्मेल स्ट्रेटवर आघाडी घेतली आणि संपूर्ण १५ फेऱ्यांमध्ये तो आघाडीवरच राहिला.

पियास्त्री संपूर्ण शर्यतीदरम्यान व्हर्स्टॅपेनच्या एक सेकंदाच्या आत होता, मात्र त्याला आघाडी गाठण्यात यश आले नाही. दुसरीकडे नॉरिसने पहिल्या फेरीत फेरारीच्या चार्ल्स लेक्लेरककडून आपली तिसरी जागा गमावली. मात्र शर्यतीच्या मध्यावर त्याला परत तिसरी जागा मिळवता आली.


व्हर्स्टॅपेनसाठी ही स्प्रिंट रेस खूपच महत्त्वाची ठरली, कारण हा रेड बुलचा नवीन टीम प्रिन्सिपल लॉरेन्ट मेकीस यांच्या नेतृत्वाखालीला पहिला विजय होता. याआधी ब्रिटिश ग्रां प्री नंतर क्रिश्चन हॉर्नर यांना पदावरून हटवण्यात आले होते. पियास्त्रीने शुक्रवारी जवळपास 0.5 सेकंदांच्या फरकाने प्रभावी पोल पोझिशन मिळवली होती. मात्र मॅक्लारेनने रेड बुलच्या तुलनेत थोडी अधिक डाउनफोर्स वापरल्यामुळे त्यांना पहिल्या फेरीतच त्याचा फटका बसला. स्पा सर्किटवर पोलवरून सुरुवात करणाऱ्या गाडीसाठी आघाडी टिकवून ठेवणे नेहमीच कठीण असते.




शर्यतीनंतर व्हर्स्टॅपेन म्हणाला, "सुरुवातीला आम्ही संधी घेतली आणि ती योग्य ठरली. नंतर DRS आणि बॅटरीचा वापर यावर खेळ सुरू झाला. संपूर्ण शर्यत 0.7 सेकंदात झाली. आमच्यासाठी ही एक मोठी कामगिरी होती." पियास्त्री म्हणाला, "मी सुरुवातीला थोडं 'टो' देऊ नये याची काळजी घेतली, पण आमच्या गाडीला पुरेशी स्ट्रेट-लाइन स्पीड नव्हती. मी समाधानकारक काम केलं, पण थोडं खंत वाटते की पुढे जाऊ शकलो नाही." या स्प्रिंट रेसमुळे मॅक्लारेनसमोर मुख्य ग्रां प्रीसाठी सेटअपचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्ट्रेट्सवर स्पीड वाढवण्यासाठी डाउनफोर्स कमी करायचा की पावसाची शक्यता लक्षात घेऊन गाडी स्थिर ठेवायची – हा त्यांच्यासमोरचा यक्षप्रश्न आहे.


टॉप-3 पाठोपाठ लेक्लेरक चौथ्या स्थानी राहिला. हॅसच्या इस्टेबन ओकोंने पाचवे स्थान पटकावले. त्यानंतर विल्यम्सचा कार्लोस साईंज, हॅसचा ऑलिव्हर बिअरमॅन, रेसिंग बुल्सचा इसॅक हॅडजर, सॉबरचा गॅब्रिएल बोर्तोलेटो आणि रेसिंग बुल्सचा लियम लॉसन अशी यादी पूर्ण झाली. अल्पाइनच्या पियरे गॅस्लीला पाण्याच्या लिकमुळे पिटलेनमधून दोन फेऱ्या मागून सुरुवात करावी लागली. दरम्यान, लुईस हॅमिल्टनसाठी ही रेस निराशाजनक ठरली. मर्सिडीजच्या किमी अँटोनेलीने त्याला शर्यतीच्या मध्यावर ओव्हरटेक केलं. त्यावेळी हॅमिल्टन त्याच्या टायर्सच्या ग्रिपवर नाराजी व्यक्त करत होता. अखेरीस तो १५ व्या स्थानी राहिला.





Post a Comment

0Comments

Post a Comment (0)