RTE प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळणार

Maharashtra WebNews
0

 



शिक्षण विभागाचे काढले परिपत्रक

मनसे पदाधिकारी आणि पालकांच्या पाठपुराव्याला यश

दिवा \ आरती परब :  दिव्यातील RTE मधून प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना दिव्यातील शाळांकडून पाठ्यपुस्तके देण्यात येत नव्हती. एस.एम.जी शाळेकडून इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचा कुठलाही शासनाचा आदेश नाही असे सांगण्यात आले होते. संबंधित नियमांची स्पष्टता पडताळून तसे परिपत्रक शाळांना काढण्यासाठी मनसेकडून शिक्षण अधिकाऱ्यांना ईमेल करण्यात आला होता. दिव्यातील एस. एम जी शाळेच्या पालकांसोबत मनसेच्या शिष्टमंडळाने काल ठामपाच्या शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन दिव्यातील सर्वअ शाळांमधील RTE पात्र विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यासंदर्भात चर्चा केली. त्या सकारात्मक चर्चेनंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी दिव्यातील RTE प्रवेश पात्र सर्व विद्यार्थ्यांना शाळेने पाठ्यपुस्तके देणे गरजेचे असल्याचे परिपत्रक काढले.

गेल्या वर्षी दिव्यातील आरटीई मधून पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळांच्या अडवणूकीमुळे उशीरा प्रवेश झाला. तेव्हा त्यांना फक्त दिव्यातील अधिकृत शाळांनी प्रवेशच दिला. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना गणवेश, पुस्तके आणि बुट बाहेरुन घ्यायला सांगितले. तसे त्यांनी घेतले ही. पण या वर्षी दुसरीत गेलेल्या आरटीईच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांसाठी पुन्हा अधिकृत शाळांनी अडवणूक केल्यामुळे पालकांसहीत विद्यार्थ्यांना शिक्षणाधिकारी आणि शाळांच्या मुख्याध्यापकांची भेट घ्यायची वेळ आली. त्यासाठी  ही त्यांना संघर्ष करायची वेळ आली. याची शेवटी दखल शिक्षणाधिकारी म्हेत्रे यांनी घेतल्यानंतर त्यांनी पालकांची आणि शाळा संचालकांची काल मिटिंग लावून चर्चा केली. त्या दरम्यान मनसे पदाधिकारी प्रशांत गावडे ही भेटून त्यांनी शिक्षण विभागाशी केलेला पाठपुरावा सांगितला. त्यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शिक्षणाधिकारी यांनी शाळांसाठी परिपत्रक काढून सर्व विदयार्थ्यांना आरटीई मध्ये मोफत पाठ्यपुस्तके, लेखन साहित्य, गणवेश, ग्रंथालयच्या सुविधा,माहिती व तंत्रज्ञानाच्या सुविधा, पाठ्येतर कार्यक्रम व खेळ देण्यास सांगितले.

त्यावेळी मनसेचे पदाधिकारी गावडे यांनी दिव्यातील ज्या शाळा RTE च्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके व इतर साहित्य देत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.  शिक्षण विभागाने त्यासंदर्भात आज परिपत्रक जारी करुन आठ दिवसात विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील असे आश्वासन शिक्षण अधिकाऱ्यांनी पालकांना आणि मनसेला दिले आहे. यावेळी  सदर बैठकीत पालक, दिवा शहर आणि ठाणे शहर मनसेचे पदाधिकारी  उपस्थित होते.



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)