समाजसेवक कैलेश पाटील यांच्या वतीने मोफत छत्री वाटप

Maharashtra WebNews
0


 दिव्यात आषाढी एकादशीनिमित्त उपक्रम 

दिवा \ आरती परब  : आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिवा विकास प्रतिष्ठान आणि श्री दत्तकृपा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते कैलेश पाटील यांच्या पुढाकाराने पार पडला.

रविवार, सकाळी ११ वाजता मुंब्रादेवी कॉलनी, रिलाईंन्स टॉवर जवळ, दिवा येथे झालेल्या या उपक्रमात परिसरातील नागरिकांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून पावसाळ्यातील अडचणींवर उपाय म्हणून नागरिकांना थेट मदतीचा हात दिला गेला.

सामाजिक कार्यकर्ते कैलेश पाटील यांनी यावेळी सांगितले की, "दरवर्षी कार्यसम्राट माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जातो, आणि यंदाही दिवा विकास प्रतिष्ठान व श्री दत्तकृपा मित्र मंडळाच्या सहकार्याने तो यशस्वीपणे पार पडला."

या प्रसंगी शाखा प्रमुख सुरेश जगताप, प्रदीप पाटील, उपशाखा प्रमुख जगदीश कदम, रुपेश लाड, संतोष तांबे, मनोज सकपाळ, तर अमोल रेडेकर, भरत मोहिते, मनोहर सकपाळ, सुरेश चव्हाण, सुशील महाडिक, आदित्य कदम, रूपाली संदीप पाटील, मनीषा सोनवणे, प्रिया पडिरुकर, मानसी कुळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले आणि उपस्थितांनी आयोजकांचे मनापासून आभार मानले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)