मुंबई, : पेटीएमने जून २०२५ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत १२३ कोटी रुपयांचा पहिला एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. कंपनीला आगामी तिमाहींमध्ये यामध्ये सातत्याने सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.
जून अखेरच्या तिमाहीत पेटीएमने १२३ कोटी रुपये करोत्तर नफा आणि ७२ कोटी रुपये एबीटा नोंदवले. कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न वार्षिक २८% ने वाढून १,९१८ कोटी रुपये झाले. कॉन्ट्रीब्युशन प्रॉफिट वार्षिक ५२% वाढून १,१५१ कोटी असून मार्जिन ६०% पर्यंत पोहोचले आहे. यामागे आर्थिक सेवा वितरणातील वाटा वाढणे, नेट पेमेंट उत्पन्नात वाढ आणि थेट खर्चात घट हे कारणीभूत आहेत.
नेट पेमेंट उत्पन्न वार्षिक ३८% ने वाढून ५२९ कोटी रुपये झाले असून यामागे दर्जेदार सबस्क्रिप्शन व्यापाऱ्यांची वाढ आणि पेमेंट प्रोसेसिंग मार्जिन्समधील सुधारणा आहे. आर्थिक सेवा उत्पन्न वार्षिक १००% ने वाढून ५६१ कोटी रुपये झाले असून, व्यापारी कर्ज वितरणातील वाढ, डिफॉल्ट लॉस गॅरंटी पोर्टफोलिओमधून ट्रेल उत्पन्न आणि सुधारलेली वसुली यामुळे हे शक्य झाले.
जून २०२५ पर्यंत सबस्क्रिप्शन व्यापाऱ्यांची संख्या १.३० कोटीच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली. डिव्हाइस व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या वाढीमुळे कंपनीने ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवली आहे आणि डिव्हाइस खर्च कमी करून कॅपेक्समध्ये कपात केली आहे, तसेच विक्री संघाची उत्पादकता वाढवली आहे.
भारताचा पूर्ण स्टॅक व्यापारी पेमेंट्स लीडर:
पेटीएम हे भारताचे पहिले आणि एकमेव एआय-सक्षम ओम्नी-चॅनेल पेमेंट्स प्लॅटफॉर्म आहे, जे हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि सेवा यांचा समावेश असलेल्या अखंड पेमेंट्स टेक स्टॅकद्वारे सेवा देते. याच आधारे कंपनीचा अंदाज आहे की १० कोटींपेक्षा जास्त व्यापारी डिजिटल पेमेंट स्वीकारतील आणि त्यापैकी ४०-५०% व्यापार व्यवस्थापनासाठी सबस्क्रिप्शन-आधारित सेवा वापरतील.
भारताच्या फिनटेक क्षेत्रात एआयचा सर्वात लवकर आणि आक्रमकपणे स्वीकार करणाऱ्या कंपन्यांपैकी एक म्हणून, पेटीएमने व्यापाऱ्यांचे ऑनबोर्डिंग, व्यवहार निरीक्षण आणि ग्राहक समाधान यामध्ये एआय समाविष्ट केला आहे.
