८ ऑगस्टपासून झी5 वर 'जारण'

 


ठाणे : हृषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती ए अँड एन सिनेमा एलएलपी आणि ए३ इव्हेंट्स अँड मीडिया सर्व्हिसेसने केली असून, याचे सादरीकरण प्रसिद्ध दिग्दर्शक अनीस बझ्मी यांनी केले आहे. ‘जारण’ ही कथा एका अशांत आणि भयावह वातावरणात अडकलेल्या कुटुंबाची आहे. एक काळोखाने वेढलेले रहस्य, भूतकाळाचे अधांतरी पडसाद, आणि त्यातून बाहेर पडण्याचा संघर्ष  या सर्व भावनांचा गुंता हा चित्रपट उलगडतो. एका आईच्या भूमिका साकारणाऱ्या अमृता सुभाष हिने “राधा” या पात्राच्या माध्यमातून मन हेलावणारी आणि अस्वस्थ करणारी सादरीकरणाची उंची गाठली आहे.


चित्रपटात अनिता दाते, किशोर कदम, अवनी जोशी, राजन भिसे आणि सीमा देशमुख यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत, आणि त्यांनीही आपली अभिनयक्षमता प्रभावीपणे सिद्ध केली आहे. ZEE मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर आणि ZEE5 मराठीच्या बिझनेस हेड हेमा यांनी सांगितले, ZEE5 मध्ये आम्ही अशा कथा सादर करतो ज्या धाडसी, सशक्त आणि भावनिकदृष्ट्या परिणामकारक असतात. ‘जारण’ ही केवळ एक हॉरर फिल्म नसून एका आईच्या दु:खाचा, तिच्या बालपणातील आघाताचा आणि मुलीच्या सुरक्षेसाठीच्या झगड्याचा भावनिक प्रवास आहे. अमृता सुभाषने राधाच्या रूपात दिलेला अभिनय प्रेक्षकांच्या मनावर खोल परिणाम करणार आहे.



जारणमध्ये काम करणं म्हणजे मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खोलवर शिरकाव करणारा अनुभव होता. ही केवळ भीती निर्माण करणारी कथा नाही, तर भीतीच्या पाठीमागे असलेल्या मानवी भावना, आठवणी, आणि असुरक्षिततेवर प्रकाश टाकणारी कलाकृती आहे.

अमृता सुभाष 



ही भूमिका माझ्यासाठी खूप वेगळी आणि आव्हानात्मक होती. ‘जारण’मध्ये भय दृश्यमान नसून मानसिक आहे.  ती तुमच्या मनात खोलवर रुतते. अमृता आणि हृषिकेश यांच्यासारख्या प्रतिभावान लोकांसोबत काम करणं ही एक प्रेरणादायक अनुभव होता. जारण’मधून मी भीतीच्या पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन ती आपल्या अंतर्मनातील दडपलेल्या भावना, आठवणी आणि भितीचं रूप आहे हे दाखवायचा प्रयत्न केला आहे. अमृता सुभाषसारख्या कलाकारामुळे या कथेला जिवंतपणा मिळाला. ZEE5 च्या प्रेक्षकांपर्यंत ही कथा पोहोचवण्याची संधी मिळणं हा माझ्यासाठी सन्मान आहे.

अनिता दाते-केळकर 


हॉरर आणि भावनांची सरमिसळ अनुभवायची असेल, तर ‘जारण’ हा चित्रपट ८ ऑगस्टपासून ZEE5 वर नक्की पहा. भय, सत्य आणि माणसातील गूढतेचा एक अतुलनीय अनुभव – केवळ ZEE5 वर!

Post a Comment

Previous Post Next Post