मुंबई : गणेशोत्सवासाठी मूर्तींची वाहतूक, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आणि मोठ्या प्रमाणात वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन सार्वजनिक हितास्तव राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर वजनक्षमता १६ टन व त्यापेक्षा जास्त असलेल्या जड वाहनांना वाहतूक बंदी लागू करण्यात आली आहे.
बंदीची कालमर्यादा
- २३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजता ते २८ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेपर्यंत – गणेशोत्सवाच्या प्रारंभीच्या तयारीसाठी.
- ३१ ऑगस्ट व २ सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते रात्री ११ वाजेपर्यंत – ५ व ७ दिवसांच्या गणपती विसर्जन व गौरी गणपती विसर्जनासाठी.
- ६ सप्टेंबर सकाळी ८ वाजता ते ७ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत – अनंत चतुर्दशी व परतीच्या प्रवासासाठी.
या वाहनांना बंदी
- अवजड वाहने
- ट्रक
- मल्टीएक्सल
- ट्रेलर
- लॉरी व तत्सम मोठी वाहने
या वाहनांना सूट राहील
- जेएनपीटी बंदर ते जयगड बंदर दरम्यान आयात-निर्यात माल वाहतूक करणारी वाहने
- दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर
- औषधे, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन
- अन्नधान्य, भाजीपाला व इतर नाशवंत वस्तू
- महामार्गावरील रस्ता रुंदीकरण व दुरुस्ती कामकाजासाठी साहित्य वाहून नेणारी वाहने
वाहतुकीची परवानगी (बंदीच्या कालावधीबाहेर)
- २८ ऑगस्ट रात्री ११ वाजता ते ३१ ऑगस्ट सकाळी ८ वाजेपर्यंत
- ३१ ऑगस्ट रात्री ११ वाजता ते २ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत
- २ सप्टेंबर रात्री ११ वाजता ते ६ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत
- सर्व वाहनांना ७ सप्टेंबर रात्री ८ नंतर नियमित वाहतूक परवानगी.
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्त, तसेच संबंधित जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक परिस्थितीनुसार वाहतुकीवरील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेऊ शकतील. जेएनपीटी व जयगड बंदरातून आयात-निर्यात मालाची वाहतूक सुरू राहावी, यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा आदेश सहसचिव राजेंद्र होळकर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला असून, गणेशोत्सव काळात कोकणातील गणेशभक्तांना सुरक्षित, सुरळीत आणि निर्बंधमुक्त प्रवासाचा दिलासा मिळावा हा यामागचा मुख्य हेतू आहे.