मुंबई : अस्सल भारतीय खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘कामत्स लेगसी’ या ब्रँडने केरळमध्ये थाटामाटात साजरा होणारा ओणम उत्सव आता मुंबईतही अनुभवता येईल, अशी घोषणा केली आहे. यानिमित्ताने ‘ओणम साध्या’ची पारंपरिक मेजवानी ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान वाशी, नरिमन पॉईंट, मालाड आणि मीरा रोड येथील सर्व ‘कामत्स लेगसी’ आउटलेट्समध्ये उपलब्ध होणार आहे.
केळीच्या पानावर वाढली जाणारी ही खास मेजवानी केवळ ८९९ रुपयांमध्ये पाहुण्यांना मिळणार असून, यात २५ हून अधिक चविष्ट पदार्थांचा समावेश असेल. कुरकुरीत केळीचे वेफर्स, लोणची, पौष्टिक सांबार, विविध करीज, मोरु करी, रसम आणि गोड पायसम यांसारखे अस्सल केरळी पदार्थ साध्याच्या रूपाने पाहुण्यांना अनुभवता येतील.
‘द विट्स कामत्स ग्रुप’चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक डॉ. विक्रम कामत यांनी सांगितले की, “ओणम हा आनंद, समृद्धी आणि एकोप्याचे प्रतीक आहे. ‘कामत्स लेगसी’मध्ये साध्या म्हणजे फक्त जेवण नाही, तर वारसा, संस्कृती आणि समुदायभावनेचा अनुभव आहे. आमच्या पाहुण्यांना ही परंपरा अनुभवायला मिळावी, हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे.”
‘कामत्स लेगसी’चे व्हाइस प्रेसिडेंट (ऑपरेशन्स) पंकज देवकर यांनी सांगितले की, दरवर्षी साध्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो. अनेक सेलिब्रिटींसह (सोनाली कुलकर्णी, पारूल चौधरी, महालक्ष्मी अय्यर, सुरभी चंदना, टिना दत्ता) यांनीही ओणम साध्या अनुभवली असून, काहींनी घरीही मागवली आहे. अस्सल घटकांचा वापर करून पारंपरिक पद्धतीने बनवलेले पदार्थ पाहुण्यांना केरळच्या चवीची खरी मेजवानी देतील.
यंदा पाहुण्यांच्या मागणीनुसार साध्याचा कालावधी दोन दिवसांनी अधिक वाढवण्याची तयारी करण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी आगाऊ नोंदणी करण्याचे आवाहन ‘कामत्स लेगसी’तर्फे करण्यात आले आहे.