शिवाईनगर म्हाडा रहिवाशांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पाऊल

 




आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात व्यापक बैठक

ठाणे : शिवाईनगर म्हाडा इमारतीतील रहिवाशांच्या समस्या, प्रश्न तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाडाचे अधिकारी व ठाणे महापालिकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत एक व्यापक बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीस म्हाडा कोकण विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे महापालिकेचे शहर विकास विभागाचे उपायुक्त तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत अधिकृत इमारतींना क्लस्टर विकासातून वगळण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच क्लस्टरशी निगडीत गुंतागुंतीच्या समस्या आणि म्हाडा इमारतीतील रहिवाशांच्या विविध शंका दूर करण्यात आल्या.



या प्रसंगी आमदार संजय केळकर म्हणाले की, “रहिवाशांच्या सर्व अडचणी शासन दरबारी योग्यरीत्या मांडून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी ठोस प्रयत्न करणार आहे. रहिवाशांना न्याय मिळवून देणे हेच माझे प्राधान्य आहे.”

या बैठकीस गृहनिर्माण फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे, ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, म्हाडाचे अधिकारी, ठाणे महापालिकेचे शहर विकास विभागाचे अधिकारी तसेच अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  शासन व प्रशासन यांच्यातील समन्वयातून शिवाईनगर म्हाडा इमारतीतील सर्व रहिवाशांच्या प्रश्नांना न्याय मिळेल, असा विश्वास या बैठकीतून व्यक्त करण्यात आला.





Post a Comment

Previous Post Next Post