दिवा / आरती परब : मुंब्रा देवी कॉलनीतील जय भवानी मित्र मंडळाने २०२१ साली स्थापना केलेल्या बाप्पाचे यंदा आपल्या पाचव्या वर्षात भव्यतेने गणेशोत्सव साजरा करत आहे. मंडळाने यंदा १८ फूट उंच गणेशाची मूर्ती उभारली असून, ही मूर्ती संपूर्ण कॉलनीतील सर्वात उंच गणेशमूर्ती ठरली आहे.
मंडळाचे अध्यक्ष अनिल हरि पाटील यांच्या नेतृत्वाखाली उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, परिसरातील भक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. धार्मिक वातावरणा सोबतच सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत मंडळ विविध उपक्रमांद्वारे नागरिकांशी संवाद साधत आहे. मुंब्रा देवी कॉलनीतील सर्वात उंच गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांत उत्साहाचे वातावरण आहे.