जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी




अमळनेर :  अमळनेर तालुक्यातील मारवड महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे मौजे कळमसरे व वासरे येथे झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली.


या पाहणीदरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी  मिनल करनवाल, अमळनेरचे तहसीलदार  रुपेशकुमार सुराणा, तसेच गटविकास अधिकारी  नरेंद्र पाटील हे मान्यवर उपस्थित होते.




मुख्य कार्यकारी अधिकारी करनवाल यांनी थेट आपतग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. त्या वेळी त्यांनी प्रशासन नागरिकांच्या सोबत खंबीरपणे उभे असून, अतिवृष्टीमधून सावरण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत व उपाययोजना तातडीने करण्यात येतील, असे आश्वासन दिले.


प्रशासनाच्या या पाहणीमुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून, नैसर्गिक आपत्तीमधून लवकर सावरण्यासाठी प्रयत्न वेगाने सुरू आहेत. 




Post a Comment

Previous Post Next Post