किल्ले दुर्गाडीवर महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची भाविकांना मदत

 


दिवा \ आरती परब : नवरात्रोत्सवानिमित्त कल्याण किल्ले दुर्गाडी येथे दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या सदस्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली. पहाटे चार वाजेपासून रात्री उशिरापर्यंत म्हणजे तब्बल १२ तास अखंडपणे कार्यरत राहून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाविकांना सुरळीत आणि शिस्तबद्ध दर्शन मिळवून दिले.


या उपक्रमादरम्यान भाविकांनीही शिस्तीचे पालन करून पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना सहकार्य केले. या सेवाकार्यात ठाणे जिल्हाध्यक्ष उमेश भारती, ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष राहुल खैर, डोंबिवली शहराध्यक्ष विक्रांत बेंद्रे, दिवा शहराध्यक्ष शैलेश पवार, भिवंडी शहराध्यक्ष करण भोईर, उल्हासनगर शहराध्यक्ष व बदलापूर शहराध्यक्ष तसेच कल्याण शहराध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


या उपक्रमाचे कौतुक करत ठाणे उपायुक्त (डीसीपी) अतुल झेंडे आणि अन्य वरिष्ठ पोलीस पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या संपूर्ण टीमचे मन:पूर्वक अभिनंदन केले.



Post a Comment

Previous Post Next Post