ठाणे महानगर पालिकेचे अतिक्रमण उपायुक्त एसीबीच्या जाळ्यात

 


ठाणे :  ठाणे महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे (Shankar Patole) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी संध्याकाळी ३५ लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, पाटोळे यांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडे कारवाई न करण्याच्या बदल्यात एकूण ३५ लाख रुपयांची लाच मागितली होती. यापैकी १० लाख रुपये यापूर्वी हप्त्याने स्वीकारले होते. उर्वरित २५ लाख रुपयांचा हप्ता स्वीकारताना बुधवारी संध्याकाळी सापळा रचून ACB अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले.




ही कारवाई सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ठाणे महानगर पालिकेत असलेल्या पाटोळे यांच्या कार्यालयाबाहेर करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा व पुढील कारवाई सुरू होती.

सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित बांधकाम व्यावसायिकाने ACB कडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ACB ने प्राथमिक पडताळणी करून सापळा रचला आणि पाटोळे हे लाचेचा दुसरा हप्ता स्वीकारताना सापळ्यात अडकले. पाटोळे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा सुरू होती. ACB अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कार्यालयातील कागदपत्रांची तपासणीही करण्यात आली.

या प्रकरणामुळे ठाणे महानगर पालिकेच्या प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, अतिक्रमण विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.





Post a Comment

Previous Post Next Post