आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी संघ दिवा शहराचा उपक्रम
दिवा \ आरती परब : आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी संघ, दिवा शहर तर्फे एस.एम.जी. विद्यालयाच्या मैदानावर भव्य “शिव मंगळागौरी” दशावतार नाट्यप्रयोग अत्यंत उत्साहात सादर करण्यात आला. दिव्यातील कोकणातील चाकरमान्यांची वाढती संख्या बघून २०२३ ला या संस्थेचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. या संस्थेमार्फत विविध कार्यक्रम दरवर्षी राबविले जातात. या कार्यक्रमाला दिव्यातील चाकरमान्यांनी मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर सभासदांनी मनोगत मांडल्यावर दिव्यातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. यात मुख्य आकर्षण ठरला तो कोकणातील पारंपरिक “शिव मंगळागौरी” दशावताराचा नाट्यप्रयोग, जो जय हनुमान पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ दांडोली आरोस, ता. सावंतवाडी यांनी सादर केला.
तसेच याला प्रमुख उपस्थिती “दशावतार” चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते सुबोध खानोलकर, ओंकार काटे आणि सुजित हांडे यांची होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघाचे संस्थापक, कार्याध्यक्ष उमेश घोगळे, अध्यक्ष बंसीधर सावंत, उपाध्यक्ष अविनाश पाटील, सचिव रामकृष्ण सावंत, उपसचिव महेश पारकर, खजिनदार समिर सावंत, उप खजिनदार महेश सावंत आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी परिश्रम घेतले. कोकणातील सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारा हा उपक्रम दिव्यातील नागरिकांसाठी एक अविस्मरणीय ठरला.
या कार्यक्रमाला तालुका प्रमुख कल्याण ग्रामीण महेश पाटील, डोंबिवली, शिवसेना शहर प्रमुख, दिवा शहर रमाकांत मढवी, माजी नगरसेवक दिपक जाधव, उपशहर प्रमुख ॲड. आदेश भगत, विभाग प्रमुख उमेश भगत, चरण म्हात्रे, निलेश पाटील, गुरुनाथ पाटील, शशिकांत पाटील, कपिल रोडे, शाखाप्रमुख केशव पाटील, डॉ दादा परब पखवाद वादक, भाजपा विजय भोईर, श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचे सर्व सभासद, बुवा संतोष शितकर, ओम विरभद्र दशावतारचे चालक उमेश धुरी, मनसे प्रकाश पाटील, उद्योजक अनिल भगत उपस्थित होते.