राष्ट्रीय हिंदू स्वयंसेवक संघाकडून वृद्धाश्रमात खाद्यसामग्री वाटप


राष्ट्रीय हिंदू स्वयंसेवक संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बिपिन कुमार दुबे यांचा उपक्रम


दिवा \ आरती परब  : दिवाळीच्या शुभ प्रसंगी राष्ट्रीय हिंदू स्वयंसेवक संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व अधिवक्ता बिपिन कुमार दुबे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या टीमसह दिवा (पूर्व) येथील साबेगाव स्थित अपना घर वृद्धाश्रमात भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांना मिष्ठान्न व विविध खाद्यसामग्री वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.


या उपक्रमा दरम्यान दुबे यांनी स्वतःच्या हाताने वृद्धांना मिष्टान्न देत स्नेहपूर्ण संवाद साधला. त्यांच्या या सेवाभावाने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक भावुक झाले आणि त्यांनी बिपिन दुबे यांना आशीर्वाद दिले. तसेच समाजात गरजू, गरीब आणि वृद्ध व्यक्तींची सेवा करत राहण्याचा सल्लाही दिला.


या प्रसंगी राष्ट्रीय हिंदू स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता बिपिन कुमार दुबे यांच्यासोबत आकाश तिवारी, विनय दुबे, विनीत सिंह आदी सदस्य उपस्थित होते. त्यांनी वृद्धाश्रमातील रहिवाशांना मिठाई आणि विविध खाद्यसामग्री भेट स्वरूपात दिली.


या वेळी बिपिन दुबे म्हणाले, “मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे. अशा सेवेमुळे मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की त्यांची मुले मोठी होऊन त्यांचा आधार बनावीत. परंतु काहीजण आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडून देतात, हे दुर्दैवी आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येकाने पुढाकार घेऊन या ज्येष्ठांचा सन्मान व सेवा करावी, हेच खरे आपले सौभाग्य आहे.”

Post a Comment

Previous Post Next Post