शिवसेना उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांचा उपक्रम
दिवा \ आरती परब : शिवसेनेचे उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या वतीने यंदाही भाऊबीज कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी दिव्यातील शेकडो महिलांना भाऊबीजेची भेट म्हणून साड्यांचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम शैलेश पाटील यांच्या दिवा (पूर्व) येथील जनसंपर्क कार्यालयात पार पडला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिव्यातील अनेक महिला भगिनी भाऊबीज निमित्त पाटील यांना ओवाळण्यासाठी त्यांच्या कार्यालयात एकत्र जमल्या होत्या. कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती इतकी उत्स्फूर्त होती की कार्यालयाबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
या वेळी माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी उपस्थित महिला भगिनींना साडी भेट देऊन त्यांच्या आशीर्वाद घेतले. त्यांनी सर्व महिलांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देत, भावंडांमधील स्नेहबंध अधिक दृढ राहो, अशी कामना व्यक्त केली.
संपूर्ण कार्यक्रम आनंद, उत्साह आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला. आयोजकांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे हा सामाजिक उपक्रम पुढील काळातही अधिक व्यापक स्वरूपात आयोजित केला जाणार आहे.
