शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले ज्योती विश्वास जाधव यांचे अभिनंदन
डोंबिवली \ शंकर जाधव : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील खोणी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच पदावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ज्योती विश्वास जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याची अभिमानास्पद घोषणा करण्यात आली आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाधव यांचे अभिनंदन केले.
सदर निवडणुकीत शिवसेनेच्या संघटित कार्यप्रणालीमुळे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या बळावर खोणी ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा झेंडा अभिमानाने फडकला आहे.या यशानंतर शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख दिपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित सरपंच ज्योती जाधव यांचा सन्मान व अभिनंदन समारंभ संपन्न झाला.
यावेळी जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे म्हणाले, ज्योती जाधव यांच्या नेतृत्वाखाली खोणी ग्रामपंचायत निश्चितच विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल. स्थानिक समस्यांवर सकारात्मक तोडगा काढत नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल.” ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मनसे नेते तथा माजी आमदार राजूद पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश पाटील यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली.
या सहकार्याबद्दल जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी आभार व्यक्त करत दोन्ही नेत्यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हा संघटक तात्या माने, उपजिल्हाप्रमुख राहुल भगत, विधानसभा संघटक सदाशिव गायकर, उपतालुका प्रमुख मुकेश भोईर, परेश पाटील, किरण पाटील, नेताजी पाटील, युवासेना तालुका प्रमुख जयेश म्हात्रे, तसेच विभाग प्रमुख व शाखाप्रमुख उपस्थित होते. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः फोनद्वारे ज्योती जाधव यांच्याशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले आणि आगामी काळात अधिक जोमाने कार्य करण्याचे मार्गदर्शन दिले.

