मुंबई : ग्राहकांना अद्वितीय मालकीहक्काचा अनुभव देण्याच्या आपल्या कटिबद्धतेला पुढे नेत, आघाडीची मास प्रिमियम कार निर्माता कंपनी किया इंडिया ने आपला एक्सटेण्डेड वॉरंटी प्रोग्रॅम ५ वर्षांवरून थेट जवळपास ७ वर्षांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.
ही नवीन विस्तारित वॉरंटी योजना किया सेल्टोस, सोनेट, सिरॉस आणि कॅरेन्स या मॉडेल्ससाठी लागू असेल. नवीन तसेच विद्यमान दोन्ही ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ज्यांच्याकडे आधीच ५ वर्षांची वॉरंटी आहे, त्या विद्यमान किया ग्राहकांना ₹३२,१७० (कर वगळून) पासून सुरू होणाऱ्या ५+२ वर्ष कव्हरेज मध्ये अपग्रेड होण्याची संधी मिळणार आहे. नवीन वाहन खरेदीदारांसाठी ही ७ वर्षांची विस्तारित वॉरंटी योजना ₹४७,२४९ (कर वगळून) पासून उपलब्ध आहे.
देशभरातील कोणत्याही अधिकृत किया डिलरशिप केंद्रावरून ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
किया इंडियाने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रोग्राम्सच्या माध्यमातून नेहमीच उत्तम ग्राहकसेवा देण्याचा ध्यास ठेवला आहे. या विस्तारित वॉरंटीमुळे ग्राहकांना देखभाल खर्चात बचत, तसेच भविष्यातील रिसेल व्हॅल्यूबाबत अधिक विश्वासार्हता मिळणार आहे.
किया इंडियाचे विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अतुल सूद यांनी सांगितले, किया इंडिया नेहमीच ग्राहकांना परिपूर्ण मनःशांती आणि दीर्घकालीन मूल्य देण्यास कटिबद्ध आहे. जवळपास ७ वर्षांपर्यंत वॉरंटी कव्हरेज वाढवून आम्ही आमच्या वाहनांच्या दर्जा आणि टिकाऊपणावर असलेला आमचा विश्वास पुन्हा दृढ केला आहे. आमचे अधिकृत सर्विस नेटवर्क ग्राहकांना सतत समर्थन देत राहील.”
