दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये जल्लोषात उद्घाटन; तरुण क्रिकेटपटूंना प्रेरणादायी पाठबळ
ठाणे : अंडर–१६ तुकाराम सुर्वे मेमोरियल क्रिकेट स्पर्धा – सीझन 2 चे उद्घाटन सोहळा दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या हस्ते पार पडला. तरुण क्रिकेटपटूंची जिद्द, आवड आणि उमेद तसेच या स्पर्धेच्या आयोजनासाठी अनिश सुर्वे आणि सुर्वे कुटुंबियांनी घेतलेला पुढाकार पाहून सर्वांनी कौतुकाची थाप दिली.
ठाणे जिल्ह्यातील गवताच्या मुळापासून क्रिकेटची बांधणी करण्यासाठी ही स्पर्धा महत्वाची ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. टीएसएम टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करत, त्यांनी करत असलेल्या कामामुळे ठाण्यातील तरुण प्रतिभावान खेळाडूंना मोठ्या संधी उपलब्ध होत असल्याचेही गौरवोद्गार अजिंक्य नाईक यांनी कढले.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईक यांनी सांगितले की, अशा स्पर्धा मुंबई क्रिकेटच्या भविष्याला आकार देणाऱ्या ठरतात, आणि अशा उपक्रमांना एमसीएकडून नेहमीच सक्रिय पाठिंबा मिळत राहील. ठाणे जिल्ह्यातील सर्व तरुण क्रिकेटपटूंना या स्पर्धेसाठी तसेच त्यांच्या भावी क्रिकेट प्रवासासाठी शुभेच्छा दिल्य.
उद्घाटन सोहळ्याला आ. संजय केळकर, डॉ. उमेश खानविलकर, अभय हादप, श्री. अरविंद कदम, तसेच एमसीएचे अपेक्स कौन्सिल सदस्य, निवड समिती सदस्य, क्लब सचिव आणि ठाणे क्रिकेटमधील वरिष्ठ मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे आणि पाठिंब्यामुळे या उपक्रमाला अधिक बळ मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

