राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन तरुणांची मनसेकडे वाटचाल
ठाणे / ओवळा-माजिवाडा विधानसभा मतदारसंघातील गायमुख-भाईंदरपाडा परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तरुणाईचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक हरिष डाकी यांच्या माध्यमातून या परिसरातील तब्बल ६३ तरुणांनी राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसेमध्ये प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्यावेळी मनसे उपजिल्हा अध्यक्ष देविदास पाटील, विभाग अध्यक्ष संदीप पाचंगे, प्रभाग अध्यक्ष मनोज परळीकर, शाखा अध्यक्ष स्वप्नील खटावकर, उपशाखाध्यक्ष प्रथमेश कल्याणशेट्टी व अभिषेक माने, तसेच महाराष्ट्र सैनिक स्वरूप देसाई, निखिल आळशी, योगेश कोळी, अजय तायडे, विनोद तायडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना हरिष डाकी यांनी सांगितले की, “राजसाहेब ठाकरे यांच्या प्रखर नेतृत्वाने आणि महाराष्ट्रप्रेमाने आजच्या तरुण पिढीला नवा दिशादर्शन दिला आहे. स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेणारा पक्ष म्हणजे मनसे, आणि म्हणूनच हे तरुण मनसेच्या झेंड्याखाली आले आहेत.”
तर उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांनी नव्याने प्रवेश केलेल्या तरुणांचे स्वागत करत, येत्या काळात स्थानिक प्रश्नांवर जोरदार लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. या नव्या प्रवेशामुळे ओवळा-माजीवडा मतदारसंघातील मनसेची ताकद अधिक वाढल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.


