महेश गायकवाड यांची शिवसेना कल्याण पूर्व व उल्हासनगर विधानसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती




कल्याण \ शंकर  जाधव : शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघटन विस्ताराच्या प्रक्रियेला वेग येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महेश गायकवाड यांची कल्याण पूर्व आणि उल्हासनगर विधानसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


आज त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हाप्रमुख मल्लेश शेट्टी आणि शहरप्रमुख निलेश शिंदे उपस्थित होते.


या प्रसंगी महेश गायकवाड यांना भावी वाटचालीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या असून, संघटन बळकटीसाठी त्यांनी जोमाने कार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


Tags : #Shivsena #Kalyan #Ulhasnagar #EknathShinde #Maharashtra #MaheshGaikwad #DrShrikantShinde

Post a Comment

Previous Post Next Post