डोंबिवलीतील जाहीर मेळाव्यात बेस्ट सेवा निवृत्त कामगारांचा एल्गार
डोंबिवली \ शंकर जाधव : बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी डोंबिवली पश्चिमेकडील पौर्णिमा सभागृहात बेस्ट कामगारांची जाहीर सभा पार पडली.मेळाव्यात समितीचे अध्यक्ष भाई पानवडीकर,सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी जयवंत तावडे, मनोहर जून्नरे,राजेंद्र सावंत,राजेंद्र अंकुला,विजय पांडे,उपाध्यक्ष मेहबूब सुतार आदिनी थोडक्यात कामगारांना मार्गदर्शनपर भाषण केले. येत्या 24 तारखेला मुंबईतील आझाद मैदानात सेवानिवृत्त कामगारांचे आंदोलन करू असे यावेळी समितीचे अध्यक्ष भाई पानवडीकर यांनी मेळाव्यात सांगितले.मराठी माणसाला देशो धडीला लावू नका. बेस्ट सेवानिवृत्त कामगारांची अवस्था गिरणी कामगारांसारखी करायची आहे का? असा थेट सवाल मेळाव्यात सरकारला करण्यात आला.
सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी जयवंत तावडे यांनी कामगारांना मार्गदर्शन करताना म्हणाले, मुंबईत 36 आमदार असून त्यांना आमच्या व्यस्था माहित नाही का?बीएसटी वाचावी अशी आमची इच्छा आहे पण राज्यकर्त्यांची अजिबात इच्छा नाही.यांना बीएसटी कोविड मध्ये, मुंबईत पाणी साचल की, मोर्चा, आंदोलन असतील तेव्हा आमची आठवण येते. मात्र आमच्या मागण्याकडे त्यांचे लक्ष नाही. आमदार हे मराठी असूनही त्याचे आमच्याकडे लक्ष देत नाही. आपले पैसे 30 नोव्हेंबर पर्यत मिळाले पाहिजेत.आम्ही भिकारी नाही, आम्हाला तुकडा नको, नसेल तर त्यांनी तस सांगाव, आमचा लोकशाही मार्गाने संघर्ष करू.
समितीचे अध्यक्ष भाई पानवडीकर म्हणाले, आपल्या समितीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे प्रदेशअध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि कल्याण लोकसभा मतदार संघांचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना सेवानिवृत्त कामगारांच्या मागण्यांचे पत्र दिले आहे. मला पुर्ण विश्वास आहे की आपल्या मागण्याकडे ते लक्ष देतील आणि आपल्याला न्याय मिळवून देतील.येत्या 24तारखेला मुबंईतील आझाद मैदान येथे बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीचे आपल्या मागण्याकरता आंदोलन करणार आहोत.
ग्रॅच्युइटीचे पैसे, कोविड भत्ता,बोनस,शिल्लक रजेचे रोखी रक्कम,लॉन्ग लिव्ह टॅव्हलिंग अलाउंस अशी रक्कम बीएसटीने कामगारांना देणे बाकी आहे. साडेचार सेवाकामगारांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याकरता आणि न्याय मिळण्याकरता बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. याआधी डोंबिवलीत सेवानिवृत्त कामगारांनी एकमताने ही समिती बनविली होती. समितीतील प्रत्येक सेवानिवृत्त कामगारांचे सुमारे 20 ते 25 लाख रुपये देणी बाकी आहेत.
